श्रीमंत प्राप्ति

श्री सिद्धिविनायक

श्री सिद्धिविनायक

श्री सिद्धिविनायक हा गणपति तलावाच्या मध्यभागी बेटावर असल्यामुळे हे मंदिर तळ्यातला गणपती म्हणूनही ओळखतात. तळ्यातला गणपती असलेले सारसबाग हे उद्यान पुण्यातील एक महत्त्वाचे पर्यटन आकर्षण आहे.१८व्या शतकात  श्रीमंत बालाजी बाजीराव यांनी पर्वती डोंगराच्या पायथ्याशी तलाव बांधण्याची कल्पना मांडली. श्रीमंत बालाजी बाजीरावांचे स्वप्न आपले ध्येय मानून श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी ते पूर्ण केले. श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी सन १७८४ साली तलावाच्या बेटावर छोटेसे मंदिर बांधून तेथे आराध्य दैवत श्री सिद्धिविनायक गजाननाची स्थापना केली. मंदिराचे प्रमुख आराध्य दैवत असलेल्या श्री गणेशाची मूर्ती लहान, पण अतिशय सुंदर, दिव्य आणि पांढरी शुभ्र आहे. मूळ मूर्ती कुरुड दगडाची होती. प्रारंभिक मूर्ती दोनदा बदलण्यात आली, एकदा १८८२ मध्ये आणि पुन्हा १९९० मध्ये.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *