श्रीमंत प्राप्ति

Shri Ram

अयोध्या प्रभू श्रीराम मंदिरः रामललाच्या दागिन्यांमध्ये सोन्यासोबत हिरे, पाचू आणि माणिकांचा वापर करण्यात आला आहे.

मुकुट बनवण्यासाठी ठेवण्यात आली होती ही अट

ट्रस्टने मुकुट बनवताना एक अट ठेवली होती प्रभू राम हे 5.5 वर्षांचे लहान बालक आहेत. मुकुट 5.5 वर्षांपर्यंतच्या मुलाच्या पोशाख आणि दागिन्यांसारखा असावा. मुकुटावर राष्ट्रीय पक्षी मोर ही बनवला गेलेला आहे.

रामललाने एकूण इतके दागिने घातले आहेत

प्रभू श्रीरामांचे दागिने बनवताना त्याच्यात 15 किलो सोने, 18,500 हिरे, 3500 माणिक, 650 पाचू आणि असंख्य मोती यांचा वापर रामलल्लाच्या दागिन्यांमध्ये करण्यात आला आहे. टिळक, मुकुट, 4 हार, कमरबंध, पायलच्या दोन जोड्या, विजय माला, दोन अंगठ्या असे एकूण 14 दागिने तयार करण्यात आले आहेत. हा दागिना 12 दिवसांत तयार करण्यात आला होता. रामललाचे दागिने तयार करण्याची जबाबदारी लखनऊच्या हरसहयमल श्यामलाल ज्वेलर्सकडे (HSJ) सोपवण्यात आली होती.

मुकुटात 75 कॅरेटचे हिरे जडलेले आहेत.

जय श्रीराम

रामललाच्या डोक्यावर सजवलेला मुकुट सोन्याचा आहे. त्याचे वजन 1700 ग्रॅम आहे. मुकुटात 75 कॅरेटचे हिरे जाम्बियन पाचू आणि सुमारे 262 कॅरेट माणिकांचा समावेश आहे. मुकुटाच्या मध्यभागी सूर्य बनवला गेलेला आहे जे की सूर्यवंशी कुलाचे प्रतीक आहे. मुकुटाच्या मध्यभागी एक पन्ना आहे, जो ज्ञानाचा सूचक आहे. मुकुटाच्या दोन्ही बाजूंना पंख तयार केले आहेत. मुकुटात बसवलेले हिरे शुद्ध आणि शेकडो वर्षे जुने आहेत, जे पवित्रता आणि सत्यतेचे प्रतीक आहेत. मुकुटाचा मागचा भाग 22 कॅरेट सोन्याचा असून त्याचे वजन 500 ग्रॅम आहे.

सोन्याचा टिळक

जय श्रीराम

भगवान श्रीरामांचा टिळक हा 16 ग्राम सोन्याचा आहे. त्याच्या मध्यभागी तीन कॅरेटचे हिरे आणि दोन्ही बाजूला सुमारे 10 कॅरेटचे हीरे जडवलेले आहेत. टिळकाच्या मध्यभागी वापरलेला माणिक Burmese रूब बर्मी माणिक आहे.

पाचूची अंगठी

प्रभू श्रीरामांना पाचूची अंगठी पण घालण्यात या आलेली आहे. त्याचे वजन 65 ग्रॅम आहे. अंगठीत चार कॅरेट चे हीरे आणि 33 कॅरेट चे पाचू आहेत. अंगठीच्या मध्यभागी गडद हिरवा जांबियन पन्ना ठेवण्यात आला आहे, जो भगवान श्रीरामांच्या सुसंवाद आणि बुद्धीचे प्रतीक आहे. भगवान श्रीरामांच्या उजव्या हातात 26 ग्रॅम सोन्याची माणिकाची अंगठी असून त्यामध्ये माणिकांसह हिरेही जडलेले आहेत.

श्रीरामांच्या गळ्यातील हार

श्रीरामांच्या गळ्यातील सजवलेला हार सोन्याचा आहे. त्याचे वजन 500 ग्रॅम आहे. 50 कॅरेट चे हीरे 50 कॅरेट माणिक आणि 380 कॅरेट पाचू जडलेले आहेत. याच्या मध्यभागी सुद्धा सूर्यवंशी चे चिन्ह आहे, जो वेढलेला आहे माणिक आणि बाजूंच्या फुलांनी.

पंचलडा हार

प्रभू श्रीराम दुसरा हार म्हणजे पंचलड़ा. पंचलड़ा चे वजन 660 ग्रॅम आहे. ज्यामध्ये 80 हिरे आणि 550 कॅरेट पाचू बसवण्यात आले आहेत. हार मधील पाच धागे पंच तत्वचे प्रतिनिधित्व करतात.

22 कॅरेट सोन्याची बनलेली विजय माळा

जय श्रीराम

प्रभू श्रीरामांच्या गळ्यातील सगळ्यात मोठा हार हा विजय माळा आहे. ही माळा 22 कॅरेट सोन्याने बनलेली आहे. आणि त्याचे वजन दोन किलोग्रॅम आहे. विजय माळेत हिंदू धर्माची प्रतीके आहेत. कमळ, कुंड, पारिजात, चंपा आणि तुळशी ही पाच पवित्र फुले पंचभूत आणि भगवान रामाचे निसर्गावरील प्रेम दाखवतात. ही फुले हाराच्या मध्यभागी बनवली गेलेली आहेत. शंख चक्र देखील या हारात चित्रित केले आहे. या हाराची लांबी भगवान श्रीरामांच्या चरणापर्यंत आहे.

कमरबंद आणि बाहूबंद

प्रभू श्रीरामांच्या कमरबंदाला 750 ग्रॅम सोन्याने बनवले आहे. यामध्ये 70 कॅरेट हिरे, 850 कॅरेट माणिक आणि पाचू वापरण्यात आले आहेत. कमरबंदमध्ये हिऱ्यांचा वापर अटूट शक्ती आणि शाश्वत गुणांचे प्रतीक आहे. रुबी भगवान रामाचे धैर्य आणि उत्कटतेचे प्रतिनिधित्व करते, श्रीरामांच्या संबंधित ज्ञान आणि शांतीचे प्रतीक आहे पाचू, मोती पवित्रता आणि अभिजाततेचे प्रतीक आहे. श्रीरामांच्या दंडासाठी 22 कॅरेट सोन्याचे 400 ग्रॅम वजनाचे बाजू दंड बनवण्यात आले आहेत.सोन्याचे 850 ग्रॅम वजनाच्या दोन बांगड्या प्रभू रामाच्या छोट्या हातावर घालण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये सुमारे 100 हिरे आणि 320 पन्ना माणिक जडले आहेत. रामललाच्या पायाची पायल 22 कॅरेट सोन्याची आहे. त्याचे वजन अंदाजे 560 ग्रॅम आहे.

जय श्रीराम

24 कॅरेट सोन्याने बनवलेला आहे धनुष्यबाण

प्रभू श्रीरामांनी हातात धनुष्यबाण घेतलेला आहे. भगवान रामाचे धनुष्य आणि बाण 1 किलो 24 कॅरेट सोन्यापासून बनवले आहेत.

चांदीची खेळणी

प्रभू श्रीराम साडेपाच वर्षांचा लहान बालक आहेत, त्यामुळे त्याच्यासाठी खेळणीही आहेत. चांदीचा घोडा, हत्ती, उंट, बनवण्यात आले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *