श्रीमंत प्राप्ति

Mercedes-Benz India 2024

 

Mercedes-Benz GLS सात-सीटर SUV

Mercedes-Benz India 2024 च्या सुरुवतीला 8 जानेवारीला भारतीय बाजारात नवीन 7 सीटर SUV कार फायनली लॉन्च झाली आहे. चला त्याच्याबद्दल थोडे जाणून घेऊया का आहेत फीचर्स

Exterior of Mercedes-Benz

Mercedes-Benz जर्मन लक्झरी कार मेकिंग कंपनी आहे. Mercedes-Benz एकूण 9 कार 2024 मधील लॉन्च करणार आहे. त्यापैकी पहिला लॉन्च 8 जानेवारीला  लॉन्च झाली आहे. कार अजून आकर्षक दिसण्यासाठी त्याच्यामध्ये काही बदल केले गेले आहेत. जसे की फ्रंट ग्रील पुन्हा डिझाईन आणि मोठा केला आहे. नवीन एअर इनलेट डिझाइन, आणि फ्रंट बंपर मध्ये डिझाइन चेंज केलेले आहे. आणि ग्लॉसी ब्लॅक सराउंडसह कार मिळणार आहे. Mercedes-Benz GLS फेसलिफ्ट हिमालय ग्रे मधे नवीन 20-इंच व्हील असणार आहेत.

Exterior of Mercedes-Benz GLS फेसलिफ्ट

Interior of Mercedes-Benz

खरेदी करणाऱ्याला इंटीरियर मध्ये दोन पर्याय मिळतील कॅटलाना ब्राउन आणि बाहिया ब्राउन. नवीन मर्सिडीज बेन्ज़ मध्ये दोन मोठ्या स्क्रीन मिळणार आहेत. त्यातील एक इन्स्ट्रुमेंट क्लस्टर साठी आणि दुसरी इन्फोटेनमेंट साठी. तसेच इन्फोटेनमेंट सिस्टम MBUX चा नवीन प्रकार तीन भिन्न डिस्प्ले मोडसह क्लासिक, स्पोर्टी आणि डिस्क्रीट सुसज्ज आहे. 11.6 ” इंच टच स्क्रीन मागील प्रवाशांसाठी सुद्धा दिले गेले आहे. त्याच्याशिवाय 7 ” इंच टॅबलेट जो की बाहेर काढता येऊ शकतो. त्या टॅबलेट द्वारे तुम्ही कार मधील विविध गोष्टी नियंत्रित करू शकता. जसे की कारची काच, म्यूजिक सिस्टम, सीट एडजस्टमेंट. अजून काही एक्स्ट्रा सुविधा जसे की 5-झोन क्लायमेट कंट्रोल, गरम सीट, वायरलेस चार्जिंग, आणि मसाज फंक्शनसह आसन.

 

Interior of Mercedes-Benz GLS

Safety in Mercedes-Benz GLS

Mercedes-Benz मध्ये सर्वोत्कृष्ट सुरक्षा उपकरणे दिलेली आहेत, जसे की एडजस्टेबल एअर सस्पेन्शन, आटोमेटिक पार्किंग. जसे की 360-डिग्री कैमरा वपराला आहे नवीन ‘ऑफ रोड’ टेक्नोलॉजी स्क्रीन वर पाहन्या साठी, हेड-अप डिस्प्ले, अँटी ब्रेक सिस्टीम ABS, पूर्ण गाडीमध्ये 9 एअर बॅग, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल होल्ड असिस्ट आणि हिल डिसेंट कंट्रोल.

 

Safety

Specification

नवीन Mercedes-Benz GLS facelift दोन 6 सिलेंडर इंजिन आहेत. GLS 400D 4Matic ला 3.0L, 325 Bhp (ब्रेक हॉर्स पॉवर) , 700 Nm (न्यूटन मीटर) टॉर्क देणारे डिझेल इंजिन आहे. आणि 450 4Matic ला 3.0L पेट्रोल इंजिन 367 Bhp (ब्रेक हॉर्स पॉवर) आणि 500 Nm (न्यूटन मीटर) टॉर्क पॉवर निर्माण करते. दोन्ही इंजिन 9-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक सह तयार आहेत. जे 4Matic AWD (ऑल व्हील ड्राईव्ह) सिस्टिम द्वारे चारही चाकांना पॉवर पाठवते.

Specification